आइसलँड येथील फॅग्राडाल्स डोंगरातुन काल अचानक ज्वालामुखाचा उद्रेक झाला, पाहा किती वर्षांनी हा स्फोट झाला

सिद्धी चासकर
मंगळवार, 23 मार्च 2021

आइसलँडची राजधानी रेकाविक येथे असलेल्या रिक्नायस पेनिनसुला येथे एका डोंगरावर ज्वालामुखाचा स्फोट झाला आहे  फॅग्राडाल्स ह्या डोंगरावर ज्वालामुखाचा उद्रेक झाला .

आइसलँडची राजधानी रेकाविक येथे असलेल्या रिक्नायस पेनिनसुला येथे एका डोंगरावर ज्वालामुखाचा स्फोट झाला आहे  फॅग्राडाल्स ह्या डोंगरावर ज्वालामुखाचा उद्रेक झाला ह्या ज्वालामुखाचा उद्रेक प्रचंड भयंकर झालायं तब्बल 800 वर्षांनी ज्वालामुखाचा स्फोट झाला,

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी भूकंप झाला होता, ज्यामुळे ज्वालामुखी फुटण्याची शक्यता होती मात्र आता ह्या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आहे 800 वर्षांपुरवी ही ज्वालामुखी भूगर्भात शांत होती मात्र आता त्याचा स्फोट झाला आहे.

फॅग्राडाल्स डोंगरातुन लालभडक लाव्हा बाहेर पडत होता ह्या लालभडक लाव्हामुळे निळाशार आकाशही लालबींड झालं होतं रिकाविकपासून सुमारे 32 किमी अंतरावरूनही या भयंकर  ज्वालामुखीचा स्फोट दिसत होता  

ज्वालामुखी झालेल्या जवळपास क्षेत्रात रहिवाश्यांना लगेचचं जागरुक  करण्यात आले जवळपासची ठिकाणं रिकामे करून तिथून लगेचचं लोकांना हलवण्यात आलं जवळपास आइसलॅंडमधील रहिवाशी याचं क्षेत्रापासूनचं अंतर लांब आहे मात्र तरीही कोणता धोका नको म्हणुन रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live