शुगर बी.पी. असलेला रूग्ण हसला अन् ...वैद्यकिय अधिक्षकांना अश्रू अनावर..

दीपक क्षीरसागर
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

नऊ दिवसापासून एका हाय शुगर आणि बी.पी. BP असलेल्या रुग्णावर येथील उपजिल्हा रुग्णालयात Hospital उपचार सुरु असून, त्यास प्रतिसाद देत गंभीर आवस्थेतील रुग्ण डॉक्टरांना पाहून हसला. अन्.. वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना अश्रू अनावर झाले

लातूर : जिल्ह्यातील निलंगा Nilanga येथील रुग्णाकडून सर्दी, ताप, खोकला हे किरकोळ कारण समजून अंगावर काढून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनत आहे. अशा चिंतेत रुग्णाची भर्ती उपजिल्हा रुग्णालयात होत आहे. गेल्या नऊ दिवसापासून एका हाय शुगर आणि बी.पी. BP असलेल्या रुग्णावर येथील उपजिल्हा रुग्णालयात Hospital उपचार सुरु असून, त्यास प्रतिसाद देत गंभीर आवस्थेतील रुग्ण डॉक्टरांना पाहून हसला. अन्.. वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना अश्रू अनावर झाले. Sugar BP The patient smiled and the medical superintendent could not hold back the tears

सध्या उपजिल्हा रुग्णालयात ६० खाटावर कोरोना Corona संक्रमित रूग्णावर उपचार केले जात आहे. रुग्णांचे शुगर, बीपी स्कोअर अधिक झाल्यानंतर रेमडेसिव्हीर Remdesivir इंजेकशन मिळत नाही, म्हणून पूढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसापर्यंत अशा रुग्णावर उपचार केले जात होते. शिवाय गंभीर झालेले रुग्ण भर्ती होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. 

या ठिकाणी दोन विभाग तयार करण्यात आले असून जवळपास ७९ गंभीर रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णासाठी स्वतः वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे हे दिवसभरात चार ते पाच वेळेस येऊन रुग्णाची तपासणी करत असतात. हाय शुगर व हाय बी.पी. असलेल्या कोरोना संक्रमित रुग्णावर  गेल्या ९ दिवसापासून उपचार सुरू असताना डॉक्टरकडून आॕक्सिजन लेवल सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. गंभीर रूग्ण वाचावे म्हणून डॉक्टरांची टिमही झटत होती. Sugar BP The patient smiled and the medical superintendent could not hold back the tears

मात्र ९ दिवसापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्ण जेंव्हा, डॉक्टरकडे पाहून हसला तेंव्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे Dr. Dilip Saundale यांना अश्रू अनावर झाले, अन् आता रूग्ण वाचणार असा आत्मविश्वास त्यांना आला. रुग्णाकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत गेला तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांला हुरुप येतो. शर्थीचे प्रयत्न करुन रुग्ण हातात येत नसेल तर मनाला फार वाईट वाटते. कधी कधी रात्र रात्र झोप येत नाही, रुग्णाचा अनुभव सांगताना वैद्यकीय अधिक्षक दिलीप सौंदळे हे भावूक झाले. 

सध्या येथील उपजिल्हा रुग्णालयात क्षमता कमी व रुग्ण अधिक अशी स्थिती झाली, असून कर्मचारी कमी पडत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी आम्हालाही समजून घेतले पाहीजे. रुग्णाच्या उपचारासाठी वेळ देणे महत्त्वाच आहे.मात्र नातेवाईकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यातच वेळ जात आहे. हा संसर्ग तिव्र असून शासनाने जाहीर केलेले नियम नागरिकांनी पाळा, कोणताही आजार साधा समजून अंगावर काढू नये, रुग्ण गंभीर आहेत. शेवटी आम्ही सुद्धा माणसंच आहोत अशी भावनिकता त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या शहरासह City ग्रामीण Rural भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असून, गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.शासनाकडून संचारबंदी जाहीर केली असली. तरी नागरिकांना याचे फारसे गांभीर्य दिसत नसून मागील वर्षी विषाणूची तिव्रता कमी असताना  केवळ जेष्ठ नागरिकच संक्रमित होत होते. त्यावेळी कडक शिस्त पाळले गेले परंतु आता विषाणूची तिव्रता वाढली असून नागरिकांना याचे फारसे गांभीर्य दिसत नाही. Sugar BP The patient smiled and the medical superintendent could not hold back the tears

यावेळी विषाणूची तिव्रता अधिक असताना तरुणवर्ग या विळख्यात जास्त सापडत आहेत. शिवाय रुग्णही लगेच गंभीर होत आहेत. सर्दी, ताप, खोकला अंगावर काढणे जिवावर बेतले जात आहे. प्रारंभी लक्षणे दिसल्यानंतर प्रथोमपचार करणे गरजेचे आहे. कांही रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्ण गंभीर झाल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. त्यामुळे तेथील डॉक्टरांना गंभीर झालेल्या रुग्णांस वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live