२४ कारखान्यांना साखर जप्तीची नोटीस, ६५७ कोटींची एफआरपी थकीत !

सागर आव्हाड
शुक्रवार, 28 मे 2021

एफआरपी थकविणाऱ्या २४ साखर कारखान्यांविरुद्ध आरआरसी नोटीस बजावण्यात आली आहे. त्या कारखान्यांमधील साखर जप्तीची कारवाई करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत

पुणे : यंदाचा गाळप हंगाम संपला तरी राज्यातील २४ साखर Sugar कारखान्यांनी Factory त्यांची ६५७ कोटींची ऊसबिलाची रक्कम Amount दिलेली नाही. उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) FRP थकविणाऱ्या या कारखान्यांविरुद्ध आरआरसीची (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई Action करण्यात आली आहे.

या कारखान्यांना साखर आयुक्तांनी मालमत्ता Property जप्तीच्या Consfication नोटीस Notice जारी केल्या आहेत. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीपोटी २१ हजार ४५४ कोटी (९३.६३ टक्के) इतकी रक्कम जमा झाली आहे. तर, १ हजार ४५८ कोटी (६.३७ टक्के) एफआरपीची रक्कम अद्याप कारखान्यांकडे थकीत आहे.

हे देखील पहा -

राज्यातील १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यापैकी १०३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केली आहे. ८१ कारखान्यांनी निम्म्याहून अधिक एफआरपी रक्कम दिली आहे. 

‘आरआरसी’ नोटीस जारी केलेले कारखाने : 

सोलापूर जिल्हा : श्री विठ्ठल वेणूनगर, विठ्ठल रिफाइंड शुगर, जयहिंद शुगर, सिद्धनाथ शुगर, गोकूळ माऊली शुगर, लोकमंगल एग्रो, लोकमंगल शुगर्स, श्री. संत दामाजी कारखाना, भीमा टाकळी,गोकूळ शुगर्स, मकाई भिलारवाडी.

उस्मानाबाद जिल्हा : लोकमंगल माऊली शुगर-लोहारा, कांचेश्वर शुगर-मंगरूळ. 
औरंगाबाद : शरद कारखाना पैठण, बीड : वैद्यनाथ कारखाना परळी, जय भवानी गेवराई. 
सांगली : एसजीझेड एण्ड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट. 
सातारा : किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज. 
नंदुरबार : सातपुडा तापी शहादा. 
नाशिक : एस.जे. शुगर मालेगाव. 
लातूर : पन्नगेश्वर शुगर रेणापूर, श्री. साईबाबा शुगर औसा. 

गाळप हंगाम अखेर स्थिती : 
शेतकऱ्यांना Farmers देय एफआरपी रक्कम : २२ हजार ८८८ कोटी 
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा एफआरपी : २१ हजार ४५४ कोटी (९३.६३ टक्के) 
प्रलंबित एफआरपी : १ हजार ४५८ कोटी (६.३७ टक्के) 

रक्तविकाराने त्रस्त असून देखील 'ती' करत आहे निरपेक्ष रुग्णसेवा

एफआरपी थकविणाऱ्या Pending साखर कारखान्यांविरुद्ध आरआरसी नोटीस बजावण्यात आली आहे. त्या कारखान्यांमधील साखर जप्तीची कारवाई करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा करण्याचा प्रयत्न होणार आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live