सततच्या लाॅकडाऊनला कंटाळून परभणीच्या व्यापाऱ्याची आत्महत्या

राजेश काटकर
गुरुवार, 1 एप्रिल 2021

शहरातील सटवाई मंदिर परिसरात राहणारे नारायण सदाशिवराव डोईफोडे वय 38 वर्ष हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन कापड व्यवसाय करत असत. लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

परभणी : शहरातील सटवाई मंदिर परिसरात राहणारे नारायण सदाशिवराव डोईफोडे, वय 38 वर्ष हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन कापड व्यवसाय करत असत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र, लाॅकडाऊनमुळे (Lock Down) आलेल्या आर्थिक संकटातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. Suicide of young trader in Parbhani by strangulation due to continuous lock down

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन लावला.  यामुळे व्यवसाय करणे मुश्किल होऊन बसले होते. नंतरच्या काळात लाॅकडाऊन उठविल्यानंतर व्यवसाय कसाबसा सुरु झाला. पण आता पुन्हा एकदा कोरोनाची (Corona) स्थिती गंभीर बनल्याने परभणीचे (Parbhani) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 8 दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे.  यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल झाले.

1 एप्रिलला लॉकडाऊन उठेल व आपला व्यवसाय चालू होईल . या अपेक्षेने नारायण डोईफोडे यांनी कर्ज काढून मालाची खरेदी केली होती.  परंतु पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ५ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला, म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या  विवंचनेतून नारायण डोईफोडे यांनी आपल्या राहत्या घरी छताला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली.  Suicide of young trader in Parbhani by strangulation due to continuous lock down

दरम्यान डोईफोडे यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या मांडला. आर्थिक मदतीची मागणीही त्यांनी  यावेळी केली. जोपर्यत मदत दिली जात नाही, तोपर्यंत डोईफोडे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. 

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live