150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही : भारत बायोटेक

covaccine.jpg
covaccine.jpg

नवी दिल्ली :  केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस  150 रुपये प्रति डोस किमतीवर देता येणार नाही, असे भारत बायोटेकने  स्पष्ट केले आहे.  याचे कारण म्हणजे केंद्राला दिलेल्या दरामुळे खासगी क्षेत्रात  लसीच्या किंमती वाढत आहे. कोरोना विरोधात वापरात असलेली कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस आहे. त्यामुळे केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसींचा पुरवठा करता येणार नाही असे भारत बायोटेकने म्हटले आहे. (Supply of covacin at Rs 150 per dose is not possible for long: Bharat Biotech) 

गेल्या आठवड्यात  केंद्र सरकारच्या वतीने राज्यांच्या लस खरेदीचा २५ टक्के वाटा उचलण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार,  भारत बायोटेक प्रति डोस 400 रुपये आणि खासगी रूग्णालयात 1200  रुपये या दराने राज्यसरकारांना देत आहे. परंतु आता एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के उत्पादन केंद्र सरकार खरेदी करणार असल्यामुळे आता कंपनीला प्रति डोस 150 रुपयांना द्यावी लागणार आहे. 

याबाबत भारत बायोटेकने  आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  भारत बायोटेकने आतापर्यंत लस विकास, क्लिनिकल चाचण्या आणि कोवाक्सीनसाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे. लस निर्मितीसाठी  लस आणि इतर औषधांच्या  किंमती, कच्च्या मालाची किंमत, उत्पादनातील बिघाड इत्यादी घटकांवर अवलंबून असते.  त्यामुळे भारतात खाजगी क्षेत्रासाठी कोरोनाच्या इतर लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिनसाठी अधिक किंमत  योग्य आहे. केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये प्रती लस या  दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा करणे ही स्पर्धा नसलेली किंमत असून ती  बाजारात  दीर्घकाळ टिकून राहू शकत नसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. 

याशिवाय  खर्च पूर्ण करण्यासाठी खासगी  क्षेत्रात लसीची जास्त किंमत असणे गरजेचे आहे. तसेच,  येत्या दोन महिन्यात म्हणजेच जुलै-ऑगस्ट पर्यन्त भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीची उत्पादन क्षमतेत 6  ते 7  कोटी पर्यंत  वाढवण्यात येईल.  तर एप्रिल पर्यन्त  दरमहा 10  दशलक्ष डोस,  तर सप्टेंबरपर्यंत दरमहा सुमारे 10  कोटी डोसचा पुरवठा अपेक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले  आहे. 

Edited By - Anuradha Dhawade 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com