सर्वोच्च न्यायालयातही होणार ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर

विहंग ठाकूर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

कोरोना परिस्थितीत बेड्सची कमतरता जाणवत असताना आता सर्वोच्च न्यायालयात ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या नियोजित वेळेपूर्वीच सुरू होत आहेत.

नवी दिल्ली: देशात कोरोनाची Corona  परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या सलग काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. या बिकट परिस्थितीशी लढण्यासाठी देशवासी सर्वतोपरी एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे सर्वोच्च न्यायालयही Supreme Court of India खारीचा वाटा उचलत आहे. Supreme Court to Establish Sixty beds covid Centre

कोरोना परिस्थितीत बेड्सची कमतरता जाणवत असताना आता सर्वोच्च न्यायालयात ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर Covid Centre उभारले जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या Summer Vacation नियोजित वेळेपूर्वीच सुरू होत आहेत.

पुढील महिन्यातील ७ मे ते २८ मे या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी असेल. या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर तयार करण्यासाठी सरन्यायाधीश Chief Justice of India एन. व्ही. रमणा यांनी मंजुरी दिली आहे. तसेच योग्य जागा उपलब्ध करण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live