पी. चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

 

 

 

 

 आयएनएक्स मीडिया प्रकरणात  पी. चिदंबरम यांची  अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली हाय कोर्टाने फेटाळली होती.  आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेले माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे..  न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील खंडपीठ चिदंबरम यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. . या निर्णयाला आव्हान देत चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी अशक्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ति आर भानुमति आणि न्यायमूर्ति ए. एस बोपन्ना यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे.
   आयएनएक्स मीडिया प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांनी अखेर चिदंबरम यांना चौकशीसाठी सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. सीबीआयने बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. 

Web Title:supreme court will hear chidambaram interim bail petition today


संबंधित बातम्या

Saam TV Live