आश्चर्यम! पाहा, सोलापुरात कसं काय रडलं झाड?

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

सोलापुरात रडणाऱ्या झाडाची चर्चा
झाडाच्या खोडातून पाण्याच्या धारा
झाडाच्या खोडाला पाण्याची धार लागली कशी?

 

 

सोलापुरात एका झाडाच्या खोडातून पाणी येऊ लागलं. हे पाणी म्हणजे झाडाचे अश्रू असल्याची अफवा पसरली. अख्ख्या सोलापुरात या रडणाऱ्या झाडाची चर्चा होती.

सोलापूर शहरातल्या बाळीवेस परिसरातील हे झाड पाहा. या झाडाच्या खोडातून पाण्याच्या धारा लागल्य़ात. झाडाच्या खोडातून नळासारखं पाणी येऊ लागल्याची चर्चा अख्ख्या सोलापुरात पसरली. लोकांची बाळीवेसच्या झाडाजवळ गर्दी झाली. मग कुणीतरी झाड रडत असल्याची अफवा पसरवली. या अफवेचं वनस्पती शास्त्रज्ञांनी खंडन केलंय.

अनेक झाडांच्या खोडांना कापल्यास त्यातून पाणी येतं. त्यामुळं झाड रडत असल्याच्या अफवेवर विश्वास ठेऊ नका.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live