भारतीय लोक भविष्याचं नियोजन करत नाही, वाचा PGIM इंडिया म्यूचुअल फंड या संस्थेचा हा अहवाल

साम टीव्ही
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

भारतीयांची बचत करण्याची सवय सुटलीय की काय असा  निष्कर्ष  सर्वेक्षणातून समोर आलय  आजवर बचतीला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांची बचत करण्याची सवय सुटलीय की काय असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झालीय. कारण तसे निष्कर्षच एका सर्वेक्षणातून समोर आलेत. 

भारतीयांची बचत करण्याची सवय सुटलीय की काय असा  निष्कर्ष  सर्वेक्षणातून समोर आलय  आजवर बचतीला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांची बचत करण्याची सवय सुटलीय की काय असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झालीय. कारण तसे निष्कर्षच एका सर्वेक्षणातून समोर आलेत. 

सध्याच्या धकाधकीच्या युगात स्वत:च्या मालकीचं घर किंवा गाडी असणं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं. अनेकजण मुलांच्या उच्चशिक्षणाच्या तरतुदीसाठी आर्थिक नियोजन करतात. पण बहुतांश लोक आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याच नियोजनच करत नसल्याचं वास्तव समोर आलंय. PGIM इंडिया म्यूचुअल फंड या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीय.
तब्बल 15 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय. 44 वर्ष सरासरी वय आणि सहा लाखांच्या आसपास वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आलीय. या सर्वेक्षणानुसार निवृत्तीनंतरच्या नियोजनापेक्षा बहुतांश लोकांनी फिटनेस आणि सध्याच्या जीवनशैलीवर अधिक खर्च करण्याला प्राधान्य दिल्याचं दिसून आलंय. तब्बल 89 टक्के भारतीयांचं निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कोणतंही निजोयन नाहीए. प्रत्येक पाच भारतीयांमागे फक्त एक जण निवृत्ती नंतरचं नियोजन करत असल्याचं दिसून आलंय.
भारत हा बचत करणाऱ्या लोकांचा देश असल्याची सर्वसामान्य धारणा जागतिक स्तरावर आहे. पण सर्व्हेक्षणातले निष्कर्ष पाहता शहरी भागात वास्तव्य करणारे भारतीय आता बचतीला प्राधान्य देत नसल्याचं दिसून आलंय. 
सध्या जर तुमचा पगार प्रति महिना 55 हजार असेल तर सध्याचा महागाईचा दर आणि उत्पन्नवाढीचा 6 टक्के वेग गृहित धरला तर 20 वर्षांनंतर तुम्हाला साधारण दीड लाख रुपयांची गरज असेल. 
हे समिकरण लक्षात घेता आजच सावध व्हा, आणि आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुरळीत व्यतित करण्यासाठी आजच नियोजन करा.


संबंधित बातम्या

Saam TV Live