सारा आणि श्रद्धानं सुशांतवर फोडलं खापर, सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचीही साराकडून माहिती

साम टीव्ही
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

 

  • 'आम्ही नाही, सुशांत घ्यायचा ड्रग्ज'
  • सारा आणि श्रद्धानं सुशांतवर फोडलं खापर 
  • सुशांतसिंहसोबत रिलेशनशीपमध्ये होती सारा 

दीपिकाप्रमाणे अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही NCB मार्फत चौकशी करण्यात आली. या दोघींनी सावध पवित्रा घेत ड्रग्जप्रकरणाचं सारं खापर सुशांतवर फोडलंय. त्यामुळे तपास अधिकारीही बुचकळ्यात सापडले आहेत. 

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCBनं सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची कसून चौकशी केली. या चौकशीवेळी दोघींनी सावध पवित्रा घेत ड्रग्जचं सारं खापर सुशांतवर फोडलं. सुशांतसिंहसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती सारानं दिली. केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगवेळी दोघेही रिलेशनशीपमध्ये होते असं सारानं सांगितलंय. पण आपण कधीही ड्रग्ज घेतलं नाही असं तिचं म्हणणं आहे. तर श्रद्धानेही हाच पवित्रा घेतला. या दोघींनी सुशांत ड्रग्ज घेत होता अशी माहिती दिल्यानं ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. 

सारा आणि श्रद्धाला NCBनं काही सवाल केले, त्याला त्यांनी काय उत्तर दिलं पाहा...

 

सकाळी 10.30 पासून सारा आणि श्रद्धाची चौकशी सुरू होती. या चौकशीत दोघींनी ड्ग्ज सेवनाचा इन्कार केला असला तरी हा तपास इथवरच संपलेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीतून बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन चव्हाट्यावर आलंय. यापुढच्या काळात आणखी काही बड्या कलाकारांची नावंही समोर येऊ शकतात याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागलेत. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live