सुशील कुमारच्या पोलिस कोठडीत 25 जूनपर्यंत वाढ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

दिल्ली न्यायालयाने Delhi Court कुस्तीपटू सुशील कुमारची Wrestler Sushil Kumar पोलिस कोठडी Police cell 25 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने Delhi Court कुस्तीपटू सुशील कुमारची Wrestler Sushil Kumar पोलिस कोठडी Police cell 25 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमार Sushil Kumar  आणि सागर  राणा Sagar  Rana  यांच्यात  झालेल्या मारहाणीत  सागर गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता दिल्ली न्यायालयाने त्याची पोलिस कोठी 25 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.  यापूर्वी आरोपी सुशील कुमारच्या पोलिस कोठडीत  6 जानेवारी आणि त्यानंतर 11 जानेवारी पर्यंत वाढ करण्यात आली होती. ज्यात आता पुन्हा 25 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही  फेटाळून लावला आहे. 

योगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा

सुशील कुमार आयसोलेट व्हे प्रोटीन, ओमेगा -3 कॅप्सूल, जॉइंट कॅप्सूल, प्री-वर्कआउट सी 4, मल्टीव्हिटामिन इ सारखी पूरक आहार घेत होता. सुशील कुमारने मागच्या सुनावणीवेळी कोठडीत त्याला  विशेष अन्न आणि पोषक आहार मिळण्याबाबत मागणी केली होती. सुशील कुमारचे वकील प्रदीप राणा यांनी  याबाबत न्यायालयत मागणी केली होती. सुशीलची तब्येत व कामगिरी कायम ठेवण्यासाठी खास पौष्टिक आहार आणि पूरक आहारांची खूप गरज आहे. म्हणूनच सुशीलने तुरूंगात विशेष अन्न आणि पूरक आहार मिळावा, अशा मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता सुशील कुमार याला तुरुंगातील इतर कैद्यांना जे  अन्न मिळते तेच अन्न खावे लागणार आहे. 

तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने बिसलेरी पाण्याच्या कॅनमध्ये पाणी भरून त्या एक काठीला बांधल्या आहेत. शारीरिक व्यायामासाठी त्याचा वापर तो  डंबेल म्हणून करत आहे. व्यायामानंतर तो कॅन्टीनमधून दूध मागवतो.   दरम्यान, 23 मे रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशील आणि त्याचा सहकारी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी सुशील आणि सागर यांच्यात  झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर राणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर  सुशील आणि अजय दोघेही फरार होते. मात्र दिल्ली 23 मे रोजी दोघांनाही अटक केली.  

Edited By - Anuradha Dhawade 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live