रविकांत तुपकरांची घरवापसी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

 

पुणे : दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आज (ता.16) धक्कादायक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

पुणे : दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आज (ता.16) धक्कादायक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ होते. त्यांना आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची चिंता लागून राहिली होती. स्वाभिमानीत अस्वस्थ असलेल्या तुपकरांना हेरून भाजपने त्यांच्याशी जवळीक वाढवली होती. त्यानंतर झालेल्या अनेक वाटाघाटीनंतर तुपकरांचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता.

यासंदर्भात त्यांनी अगोदर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, तुपकरांनी भाजपमध्ये न येता राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून भाजपसाठी काम करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

त्यानुसार तुपकरांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. मात्र, प्रवेशानंतर तुपकर शांत झाले आहेत. तडफदार वक्ते असलेल्या तुपकरांनी भाजपसाठी अजूनपर्यंत एकही सभा घेतलेली नाही. भाजपकडूनही आपल्याला फसवले गेलेय, अशी त्यांची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ते रयत क्रांती सोडून पुन्हा स्वगृही परलेत.. 

Web Title: Swabhimani Party state president Ravikant Tupkar will take shocking political decision today
 


संबंधित बातम्या

Saam TV Live