पंढरपुरात घडतोय स्वदेस पार्ट २

साम टीव्ही
बुधवार, 3 मार्च 2021

आशुतोष गोवारीकरांचा 'स्वदेस' सगळ्यांना आठवत असेलच अगदी तसाच वास्तवातला स्वदेस चा पार्ट २ आकाराला आलाय पंढरपूर तालुक्यातल्या खेडभाळवणी गावात. खेडभाळवणी गावच्या सरपंचपदी एका आय आय टीयन तरुणानी बाजी मारलीय. गावाला एक उच्चशिक्षित सरपंच लाभला आहे.  

आय आय टी मुंबईमध्ये एरोस्पेस या विषयात पदवी घेतलेल्या एका उच्च शिक्षीत तरूणाची पंढरपूर तालुक्यातल्या खेडभाळवणी गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे. डाॅ. संतोष साळुंखे असं या उच्चशिक्षित तरूण सरपंचाचं नाव आहे. उच्चशिक्षित तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतानाच संतोष साळुंखे यांनी मात्र आपल्या शिक्षणाचा फायदा गावाला व्हावा यासाठी थेट गावगाड्यात येण्याचा मोठा निर्णय घेतला. 

ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून  65 वर्षात प्रथमच गावात सत्तांतर घडले आहे. याच संधीचा फायदा घेत खेडभाळवणीकरांनी गावातल्या उच्चशिक्षित तरूणाला सरपंचपदाची संधी दिली आहे. सुशिक्षित सरपंच मिळाल्याने ग्रामस्थांनाही गावाच्या विकासाची आस लागली आहे.

अनेक मोहन भार्गव परदेशातून आपल्या गावातल्या विकासाच्या ओढीनं मायदेशी येतायत, डॉ. संतोष साळुंखे हे सुद्धा परदेशातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून मायदेशी परतले , सध्या ते पंढरपुरातल्या स्वेरी इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये डीन म्हणून काम पाहतायत. शिवाय गावातल्या तरुणांना  लघुउद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा यासाठी डॉ. साळूंखे काम करतायत. 

फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live