VIDEO | लिंबाच्या झाडातून येतोय मधूर रस

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

हेच ते लिंबाचं झाड...या झाडाकडे बघा, गेले तीन-चार दिवसांपासून या लिंबाच्या झाडातून सतत फेसाळलेला पांढऱ्या रंगाचा रस बाहेर पडतोय...हा चमत्कार असल्याचा दावा करून झाड पाहण्यासाठी दूरवरून लोक गाड्या करुन येतायत...इतकंच नव्हे तर रसाची चव मधासारखी असल्याने झाडाची पूजा करून रस प्राषण करतायत...

लिंबाच्या झाडातून गोड पाणी येत असल्याची बाब वाऱ्यासारखी पसरली...निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय...पण, खरंच हा चमत्कार आहे की अजून काही कारण...? याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली...याबद्दल अधिक माहिती वनस्पती अभ्यासक देऊ शकतात...आमचे प्रतिनिधी संतोष जोशी हे वनस्पती अभ्यासकांना भेटले...त्यांना व्हायरल व्हिडीओ दाखवला आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

लिंबाच्या झाडातून रस निघणे हा चमत्कार नाही 

झाडाला जखम, फंगल इन्फेक्शन झालं तर अश्या प्रकारचा रस बाहेर पडतो 

हा चमत्कार नसून विज्ञानाच्या व्याख्येत गमोसीस असे म्हणतात

झाडातून रस बाहेर येणं हे नैसर्गिक असल्याचं समोर आलं...त्यामुळं आमच्या पडताळणीत हा चमत्कार असल्याचा दावा असत्य ठरला...

WebTittle :: Sweet juice coming from the lemon tree

संबंधित बातम्या

Saam TV Live