कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना करा - विजय वडेट्टीवार

vijay-vadettivar
vijay-vadettivar

चंद्रपूर : चंद्रपुरात  Chandrapur कोरोनाचा Corona प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाची तिसरी लाट Third Wave  लहान मुलांसाठी घातक असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन लहान मुलांसाठी ५० ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्यात यावे. याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री Minister for Disaster Management, Relief and Rehabilitation तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी ब्रम्हपुरी Bramhapuri येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला Department of Health दिले आहेत. Take immediate action before the third wave of corona arrives says Vijay Wadettiwar

शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आयोजित कोविड Covid विषयक आढावा बैठकीत Meeting ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना Measures करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्याच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्येही Children वाढताना दिसत आहे. त्यामुळे, वेळीच लक्ष देऊन या गंभीर समस्येकडे योग्य त्या उपाययोजना वेळीच करण्याची गरज आहे".

हे  देखील पहा -

ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी १०० ऑक्सीजन बेड Oxygen beds कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच ३३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर Oxygen concentrator उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर ७८ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर ब्रह्मपुरी येथे आलेले आहेत. कोरोना उपाययोजनेसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात  प्रत्येक ग्रामपंचायतीला Gram Panchayat निधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरलेला आहे. Take immediate action before the third wave of corona arrives says Vijay Wadettiwar

गावात विलगीकरण कक्ष उभारणे त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, आवश्यक साहित्य खरेदी करून उपलब्ध करून देणे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला आहे तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी Funding उपलब्ध करून दिला आहे. निधीचा गैरवापर होता कामा नये, त्या निधीचा वापर आरोग्य सोयी-सुविधेसाठीच करावा, अशी दक्षता घेतली जावी अशा स्पष्ट सूचना वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com