रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी दादाची ही अनोखी शाळा एकदा पहाच

साम टीव्ही
शुक्रवार, 19 मार्च 2021

पुण्याच्या रस्त्यावर भरते 'दादाची शाळा'
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अनोखी शाळा
हसत-खेळत मुलं गिरवताय बाराखडी

 

 

 

रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांसाठी पुण्यात दादाची शाळा भरतंय या शाळेत सध्या 100 हून अधिक मुलं जीवनाची बारखडी गिरवत आहेत. नेमकी काय आहे  दादाची शाळा ही संकल्पना पाहुयात खास

इंग्रजी मुळाक्षारे गिरवणारी ही मुलं आतापर्यंत शाळेची पायरीही चढलेली नाहीत...रस्त्यावर फुले -फुगे विकणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात हा बदल घडवून आणलाय दादाच्या शाळेनं.या शाळेत मुलांना हसत-खेळत शिक्षण दिलं जातंय. अभिजित पोखर्णीकर आणि त्याचे सहकारी पुण्यातील रस्त्यावर दादाची शाळा चालवत आहेत.

अभिजित पोखर्णीकर आणि त्यांच्या टीमनं सुरुवातीला मुलांना खाऊ देऊन शाळेत आणलं त्यानंतर हळूहळू खाऊ देणं बंद केलं.मात्र तरीही शिक्षणाच्या गोडीनं  ही मुलं शाळेत येतायेत.

ही मुलं जेव्हा इंग्रजीतून स्वतःची ओळख करुन देतात तेव्हा दादाच्या शाळेचं चीज झाल्यासारखे वाटते,शाळांबाह्य मुलांसाठी दादाची शाळा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे साम टीव्ही 

 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live