विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : फडणवीस 

विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : फडणवीस 

मुंबई : विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सध्या फोन टॅपिंग बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे. 

तथापि, राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी. 

टॅपिंगचा आरोप ज्या काळात होतोय त्या काळात गृहराज्यमंत्री शिवसेनेकडेही होते. असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेकडे बोट दाखवले आहे. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही,असे कोणेतेही टॅपिंग झाले नाही असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत आपल्या ट्‌वीटमध्ये म्हणाले, 'माझा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं संभाषण'. 
 

WebTittle:: Tapping the opponents' phones is not the culture of Maharashtra: Fadnavis


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com