Tauktae Cyclone अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Ajit Pawar Took Stock of the Situation about Tauktae Cyclone
Ajit Pawar Took Stock of the Situation about Tauktae Cyclone

मुंबई : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के  वादळाच्या Tauktase पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील Maharashtra वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tauktae Cyclone Ajit Pawar Took Stock of the Mumbai Situation

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई Mumbai उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य  प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. Tauktae Cyclone Ajit Pawar Took Stock of the Mumbai Situation

मुंबईच्या जुहू चौपाटीवर तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथके मुंबईतल्या विविध समुद्र किनारी तैनात करण्यात आली आहेत.  जुहू समुद्र किनारी ही पथेक त्यांच्या यंत्रमांसह सज्ज असल्याचे पहायला मिळते आहे. दरम्यान, चक्री वादळाच्या पार्श्वभूमिवर ३ तास  विमानतळ सेवा बंद राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत विमानतळ सेवा बंद ठेवली जाणार आहे. मुंबईत मागच्या २४ तासात ४४ झाडं आणि त्याच्या मोठ्या फांद्या पडल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. तर २४ तासात २ शाॅर्ट सर्किटच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते’चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे त्यामुळं कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा जबरदस्त प्रभाव जाणवल्या नंतर त्याची तीव्रता आता  पालघर किनारपट्टीला जाणवू लागली आहे.पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी आणि ग्रामीण भागात अधिक होण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर समुद्रकिनारपट्टीभागाला सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. Tauktae Cyclone Ajit Pawar Took Stock of the Mumbai Situation

आज व  उद्या पुढील दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे. हे वादळ आता कोकण किनारपट्टी भागातून पुढे गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.त्यामुळं पहाटे पासून पालघर किनारपट्टी भागात सुसत्याचा वारा आणि पावसाची रिपरिप सुरू झाली असून यानंतर हे वादळ अधिक तीव्र होण्याची स्थिती निर्माण झाली आहे
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com