तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे नुकसान कोट्यावधीची उलाढाल ठप्प

RAtnagiri
RAtnagiri

रत्नागिरी - तोक्ते Tauktae चक्रीवादळाचा Cyclone फटका Damage मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक बोटी रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणच्या बंदरात आणि खाडीपट्ट्यात उभ्या आहेत. वेगवान वा-यामुळे उभ्या असलेल्या बोटा एकमेकांवर आपटून फुटल्या आहेत. Tauktae Cyclone Damages Fishermens

रत्नागिरीतील सर्वात मोठ बंदर असलेल्या मिरकरवाडा बंदरात जवळपास 500 हून अधिक बोटी आहे. वादळाचा फटका या बोटींना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी Ratnagiri जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रत्नागिरीची अर्थव्यवस्था ही आंबा उत्पादन आणि मच्छिमारीवर अवलंबून आहे.

हे देखील पहा -

मात्र वादळाचा फटका यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. गेल्या काही वर्षात अनेक छोटीमोठी वादळे आली आणि यात इथला स्थानिक मच्छिमार Fisherman भरडला गेला आहे. यावर्षी देखील मच्छिमारी हंगाम फारसा चांगला गेला नाही खराब हवामान आणि येणारी चक्रीवादळ याचा परिणाम मच्छिमारीवर जाणवला आहे. Tauktae Cyclone Damages Fishermens

तोक्ते चक्रिवादळाने देखील मोठे नुकसान स्थानिक मच्छिमारांचे केले आहे. जिल्ह्यातील बंदरात आणि खाडीपट्ट्यात जवळपास 3500 पेक्षा अधिक मच्छिमारी नौका या उभ्या आहेत तर 85 परप्रांतीय नौका देखील बंदरात उभ्या आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे सुटलेल्या जोरदार वाऱ्याचा फटका हा मच्छिमारी नौकांना बसला आहे.

मिरकरवाडा बंदरातील नौका एकमेकांवर आपटून फुटल्या आहेत. जयगडमध्ये दोन नौका पाण्यामध्ये बुडाल्याया आहेत तर हर्णे बंदरात देखील काही मच्छिमारी नौंकांचे  फुटून नुकसान झालेले आहे. Tauktae Cyclone Damages Fishermens 

रत्नागिरीचे अर्थकारण Economy अवलंबून असलेल्या मच्छिमारी व्यावसायाला गेल्या काही वर्षापासून ग्रहण लागल आहे. खराब वातावरण आणि वादळ याचा सामना मच्छिमार करतोय. तोक्रे चक्रीवादळामुळं मच्छीमारांनी गेल्या आठ दिवसांपासून मच्छिमारी नौका या बंदरात उभ्या करुन ठेवल्यात त्यामुळे कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. 

Edited By : Krushnarav Sathe
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com