Tauktae Cyclone - भीमाशंकर परिसरात उडाले घरांचे पत्रे

Tautkae Cyclone effect in Pune District
Tautkae Cyclone effect in Pune District

भीमाशंकर :  कोरोनाच्या Corona संकट काळात तौत्के चक्रीवादळाचे नवीन संकट उत्तर पुणे जिल्ह्याच्या Pune खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या पश्चिमकडील भागात उभे रहाले असून आज पहाटेच्या सुमारास भीमाशंकर Bhimashankar परिसरातील भोरगिरी,भिवेगाव व इतर १५ गावांमध्ये वादळी वा-यासह पावसाच्या सरी झाल्या यामध्ये अनेकांच्या घरावरील छताचे पत्रे उडाले. भिवेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील छतही उडाल्याची घटना घडली आहे. Tauktae Cyclone Effect in Pune district 

मागील वर्षाच्या चक्रीवादळात सर्वाधिक फटका प्राथमिक शाळांना बसला होता. नव्याने उभारण्यात आलेल्या शाळांचे छत चक्रीवादळात Cyclone वादळात उडाले होते. त्या घटनेची आता पुनरावृत्ती झाली आहे. आज पहाटे भिमाशंकर परिसरातील शाळा व घरांची छत उडाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांसह शासकिय मालमत्तेची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

सह्याद्री Sayhyadri पर्वत रांगाच्या कुशीत तौक्ते चक्रीवादळाचा फटाका बसत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील पर्वत रांगांमध्ये आदिवासी समाज वास्तव्यास आहे. आधीच कोरोनाच्या संकटात मागील एक वर्षापासुन संघर्ष करत असताना आता नव्याने आलेले तौत्के चक्रीवादळाचे संकट मोठं नुकसान करत आहे. त्यामुळे शासकिय पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ पंचनामे करत आदिवासी भागात मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी केली आहे. Tauktae Cyclone Effect in Pune district 

दरम्यान, गेल्या सहा तासांत तौत्के चक्रीवादळ Tautkae Cyclone अतितीव्र झालं असून पूर्व मध्य अरबी समुद्रात Arabian Sea ११ किलोमीटर प्रतितास वेगानं ते उत्तरेकडे सरकलं आहे. येत्या २४  तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ उत्तर, वायव्येला सरकत ते १७  मेच्या संध्याकाळ पर्यन्त गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल, आणि १८ मे रोजी सकाळी भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा इथं धडकेल.

सिंधुदुर्ग - तौत्के चक्री वादळ गोव्यानंतर आता सिंधुदुर्गाच्या मालवण समुद्रात दाखल झाले आहे. समुद्रात चार ते पाच फूट उंचीच्या लाटा उसळलेल्या पहायला मिळत आहेत. येथून ६७ लोकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.  पावसाचा जोर सुद्धा वाढला आहे. मालवणकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर झाडे कोलमडून पडली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प देखील होती. Tauktae Cyclone Effect in Pune district 

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com