Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळ- जाणून घ्या आताची राज्यातली स्थिती (व्हिडिओ)

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 16 मे 2021

गेल्या सहा तासांत तौत्के चक्रीवादळ Tauktae Cyclone अतितीव्र झालं असून पूर्व मध्य अरबी समुद्रात Arabian Sea ११ किलोमीटर प्रतितास वेगानं ते उत्तरेकडे सरकलं आहे. येत्या २४  तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

मुंबई : गेल्या सहा तासांत तौत्के चक्रीवादळ Tauktae Cyclone अतितीव्र झालं असून पूर्व मध्य अरबी समुद्रात Arabian Sea ११ किलोमीटर प्रतितास वेगानं ते उत्तरेकडे सरकलं आहे. येत्या २४  तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ उत्तर, वायव्येला सरकत ते १७  मेच्या संध्याकाळ पर्यन्त गुजरातच्या Gujrat किनारपट्टीवर धडकेल, आणि १८ मे रोजी सकाळी भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा इथं धडकेल. Tauktae Cyclone Update in Maharashtra

सिंधुदुर्ग - तौत्के चक्री वादळ गोव्यानंतर आता सिंधुदुर्गाच्या Sindhudurg मालवण समुद्रात दाखल झाले आहे. समुद्रात चार ते पाच फूट उंचीच्या लाटा उसळलेल्या पहायला मिळत आहेत. येथून ६७ लोकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.  पावसाचा जोर सुद्धा वाढला आहे. मालवणकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर झाडे कोलमडून पडली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प देखील होती.

मुंबई - तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत Mumbai ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. Tauktae Cyclone Update in Maharashtra

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन

त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे. प्रामुख्याने तीन भव्य (जंबो) कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये  सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) BKC कोविड केंद्रातील २४३ आणि मुलुंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, प्राणवायू पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलिंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, इतर सयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. 

दरम्यान, तौत्के चक्रीवादळासंदर्भात राज्याच्या तयारीविषयी आज मुख्यमंत्री उद्धव Uddhav Thacke;ray  ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्याशी तोक्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत. 

आमदार संजय गायकवाड यांनी अखेर केली दिलगिरी व्यक्त

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ११ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयातील डिझास्टर कंट्रोल रूमला भेट देऊन "तौत्के" चक्रिवादळ परीस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर महापौर जंम्बो कोविड केअर हाँस्पिटलमधील कोविड १९ संसर्गबाधीत रुग्णांना ज्या बीएमसी हाँस्पिटलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलंय तिथली पहाणी करणार आहेत. Tauktae Cyclone Update in Maharashtra

भीमाशंकर - कोरोनाच्या संकट काळात तौत्के चक्रीवादळाचा नवीन संकट उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्याच्या पश्चिमकडील भागात उभे रहाले असुन आज पहाटेच्या सुमारास भिमाशंकर परिसरातील भोरगिरी,भिवेगाव व इतर १५ गावांमध्ये वादळी वा-यासह पाऊसाच्या सरी झाली यामध्ये अनेकांच्या घरावरील छत उडाली तर भिवेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील छत उडाल्याची घटना घडली आहे 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live