कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड... 

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

कोरोना टेस्टच्या अवहालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात राहणार आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आरोपी आशिष विरोधात याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रेल्वे प्रवाशांनी अशा बनावट टीसी पासून सावधान रहा ,असा काही प्रकार आढळल्यास तत्काळ कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे.

मुंबई - कोरोना Corona टेस्टच्या अवहालाच्या नावाखाली रेल्वे Railway प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला TC रेल्वे पोलिसांनी Police अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात राहणार आहे. TC swindling passengers in the name of Corona Test

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार Criminal असलेला आरोपी आशिष विरोधात याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रेल्वे प्रवाशांनी अशा बनावट टीसी पासून सावधान रहा ,असा काही प्रकार आढळल्यास तत्काळ कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे.

हे देखील पहा -

कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर काल संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या पत्नीसह लोकलची वाट पाहत बसला होता. इतक्यात त्याच्या जवळ आलेल्या आशिषने  त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली. सदर तरुणाने तिकीट दाखवताच आशिषने त्यांच्याकडे आरटी पीसीआर सारख्या कोरोना टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट दाखविण्याची मागणी केली. त्याच्याकडे सर्टिफिकेट नसल्याचे कळताच आशिषने त्यांच्याकडे 300 रुपयांच्या दंडाची मागणी केली. TC swindling passengers in the name of Corona Test

शेतकरी आंदोलनाचे ६ महिने; नंदुरबारात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे काळा दिवस

यामुळे या दाम्पत्याला संशय आल्याने त्यांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांकडे नेले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बनावट टीसी असल्याचे निष्पन्न झालं.पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर सुरत पोलीस ठाण्यासह कल्याण मधील विविध पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल असून त्याने यापूर्वी किती गुन्हे केले याचा तपास सुरू असल्याचे कल्याण रेल्वे पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live