22 वर्ष विद्याज्ञानाची सेवा, तरीही पोरा-बाळांना घेऊन शाळेत राहायची वेळ

साम टीव्ही
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

ज्यानं तब्बल 22 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं. पण आज त्याच शिक्षकावर पोरा-बाळांना घेऊन शाळेच्या वर्गात राहायची वेळ आलीय. ही वेळ त्यांच्यावर का आणि कुणी आणली. पाहूयात नांदेडच्या एका शिक्षकाची चित्तरकथा.

ज्यानं तब्बल 22 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं. पण आज त्याच शिक्षकावर पोरा-बाळांना घेऊन शाळेच्या वर्गात राहायची वेळ आलीय. ही वेळ त्यांच्यावर का आणि कुणी आणली. पाहूयात नांदेडच्या एका शिक्षकाची चित्तरकथा.

पाहा व्हिडिओ - 

शाळेचा वर्ग. संपूर्ण वर्गात बेंच आणि जिथं उभं राहून शिकवावं तिथं बसून चाललेला स्वयंपाक. तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे. पण मंडळी हे काही सहलीला आलेले पर्यटक नाहीत. तर हे आहेत याच शाळेचे शिक्षक. नाव भास्कर लोखंडे. पोटच्या पोरा-बाळांना घेऊन वर्गात स्वयंपाक बनवण्याची वेळ भास्कर लोखंडेंवर आणलीय. तिही ते ज्या शाळेत 22 वर्षांपासून शिकवतात त्या नांदेडच्या मीनाक्षी देशमुख गर्ल्स विद्यालयानेच. आधीची काही वर्ष विनाअनुदानित पद्धतीने तासिका तत्वावर ते शिकवायचे. तेव्हा त्यांना त्याचं मानधन मिळायचं पण, त्यानंतर कित्येक वर्ष त्यांना पगारच दिला गेलेला नाहीय. उपचार करूनही पत्नीचं झालेलं निधन आणि न मिळणारा पगार  ते रस्त्यावर आलेत.

असं असलं तरी, शाळेच्या संचालिकांनी मात्र भास्कर लोखंडे यांचे आरोप फेटाळून लावलेयत.

चूक कोण, बरोबर कोण हे काही दिवसांत कळेलच. पण ज्या माणसानं तब्बल 22 वर्ष शाळेत विद्यादानाची सेवा केली, त्या शिक्षकावर अशी वेळ येणं हे शाळेला, सरकारला आणि एकूणच व्यवस्थेला न शोभणारं आहे. पोरांना घेऊन, घरदार सोडून शिक्षकाला शाळेत राहावं लागत असेल तर, शाळेनं याप्रकरणी साहनुभूतीनं विचार करून मध्यममार्ग काढायला हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live