शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून निश्‍चित...अखेर मुहुर्त लागला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

सोलापूर : शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. दरम्यान, भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी गुरुजींनी आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी भरती मार्गी लावावी अन्यथा निवडणुकांत हिसका दाखवूण असा इशारा डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिला आहे. 

आगामी निवडणुकांत सरकारविरोधात सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी नको म्हणून सरकारकडून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यानुसार भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्‍तांनी संबंधित जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे. दरम्यान, राज्यातील 36 टक्‍के शाळांनी विशेषत: जिल्हा परिषदेने बिंदुनामावली अपडेट केले नाही. दुसरीकडे मंजूर प्रवर्ग आणि नियुक्‍ती प्रवर्ग वेगळा असल्याचे समोर आल्याने शिक्षक भरतीबाबत भावी गुरुजींची चिंता आणखीच वाढल्याचे पहायला मिळते. केंद्राने आर्थिक निकषांनुसार सवर्णांना 10 टक्‍के आरक्षण जाहीर केले, परंतु त्याबाबत शिक्षण विभागाला लेखी पत्र मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू होईल का, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पाही पार पडणार असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल की नाही, याची उत्सुकता लागली आहे. 

भरतीचा ठरला नियोजित कार्यक्रम 
- पहिल्या टप्प्यात 18 हजार जागा भरती 
- 21 जानेवारी : पवित्र पोर्टलवरील अर्ज दुरुस्ती 
- 30 जानेवारी : पवित्र पोर्टल अपलोड करणे 
- 3 फेब्रुवारी : भरतीची जाहीरात प्रसिद्ध करणे 

Web Title: teacher recruitment in Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live