पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 जानेवारी 2019

जळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अयोध्यानगरातील सिद्धिविनायक माध्यमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ विठ्ठल पाटील (वय 45) हे खेडी शिवारातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील ज्ञानचेतना अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहतात. शाळेत घटकचाचणी परीक्षा सुरू असून, आज नेहमीप्रमाणे पाटील हे सकाळी शाळेत आले होते. परीक्षक म्हणून सकाळी साडेदहापर्यंत काम केले. त्यानंतर तब्येत बरी नसल्याचे मुख्याध्यापक अर्ध्या दिवसाची रजा घेऊन घरी निघून गेले. त्यानंतर पाटील हे दुचाकीने घरी गेले.

घरी आल्यानंतर जगन्नाथ पाटील यांनी पत्नी नंदा यांना मी ऊन खाण्यासाठी गच्चीवर जात असल्याचे सांगत ते गच्चीवर गेले. मात्र, काही वेळातच पाटील यांनी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जगन्नाथ पाटील यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, जिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आजारपणामुळे आले होते नैराश्‍य 
पाटील यांचा स्वभाव मितभाषी व सर्वांशी मिळून राहण्याचा होता. पण गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने ते नैराश्‍यात होते. नैराश्‍यातूनच त्यांनी आत्महत्या करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा होती. पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या शाळेत होणारे स्नेहसंमेलन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा इतर कार्यक्रमांमध्ये पाटील हे उत्स्फूर्तपणे सहभाग घेत होते. त्यांना सुगम संगीतासह तबला वादनाची आवड असल्याने प्रत्येक कार्यक्रमात संगीत व तबला वाजवीत असल्याची आठवणी कायम राहील, असे जिल्हा रुग्णालयात आलेल्या सहकारी शिक्षकांनी सांगितले. 

रुग्णालयात गर्दी 
पाटील हे 1997 पासून सिद्धिविनायक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील हे पाचवी ते सातवीच्या वर्गांत शिकवीत होते. पाटील हे शांत स्वभावाचे असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांसह नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

Web Title: Teacher's Suicide by jumping from the fifth floor


संबंधित बातम्या

Saam TV Live