बलात्काराच्या आरोपातून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता

अनिल पाटील
शुक्रवार, 21 मे 2021

तहलका’ मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्याविरोधात 2013 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणी म्हापसा जलद न्यायालयाने तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्तता केली आहे

पणजी : 'तहलका’ Tehelka मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल Tarun Tejpal यांच्यानविरोधात 2013 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार Rape प्रकरणी म्हापसा Mapusa जलद न्यायालयाने तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्तता केली आहे. Tehelka Editor Tarun Tejpal Aquitted in rape case by Goa Court

तरुण तेजपाल यांना उत्तर गोव्यातील Goa पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाल्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 ला अटक करण्यात आली होती.

हे देखिल पहा 

29 सप्टेंबर, 2017 रोजी कोर्टाने त्याच्यावर बलात्कार, लैंगिक छळ आणि चुकीचा बंदीवासासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवले होते. तथापि, आपण दोषी नसल्याचे तेजपाल यांनी म्हंटले होते.

गडचिरोलीत पोलिसांकडून १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

सप्टेंबर 2017 मध्ये खटला सुरू झाला परंतु उशीर होतच राहिला.तेजपाल यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपाला आव्हान दिले. Tehelka Editor Tarun Tejpal Aquitted in rape case by Goa Court

ऑगस्ट 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बाजू फेटाळली आणि खटला इन-कॅमेरा (सार्वजनिकरित्या उघडला जाऊ नये) ठेवण्यासाठी आणि सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून अनेक साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अखेर मापसा न्यायालयानं तरुण तेजपाल यांना निर्दोष सोडले आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live