हिंमत असेल तर माझे शिर धडापासून वेगळे कराः ओवेसींचे योगींना आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

हैदराबादः मला किंवा कोणत्याही मुसलमानाला या भूमीवरुन कोणीही पळवून लावू शकत नाही. हिंमत असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझे शिर धडापासून वेगळे करुन दाखवावे, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले आहे.

हैदराबादः मला किंवा कोणत्याही मुसलमानाला या भूमीवरुन कोणीही पळवून लावू शकत नाही. हिंमत असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझे शिर धडापासून वेगळे करुन दाखवावे, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले आहे.

तेलंगणामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विकाराबाद जिल्ह्यातील तांडूर शहरात योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेदरम्यान ओवेसींवर जोरदार टीका केली होती. तेलंगणात भाजपा सरकार सत्तेवर आले तर ज्याप्रमाणे निजामांना पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. तीच परिस्थिती ओवेसीची करु आणि त्यांना हैदराबादमधून पळून जाण्यास भाग पाडू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, 'मला किंवा कोणत्याही मुसलमानाला या भूमीवरुन कोणीही पळवून लावू शकत नाही. तुम्ही आम्हाला हैदराबादमधून पळवू इच्छिता. आमचे शिर तुम्हाला हवे आहे. हिंमत असेल तर योगी आदित्यनाथ यांनी माझे शिर धडापासून वेगळे करुन दाखवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगी आदित्यनाथ यांना असे वक्तव्य करण्यासाठी चिथावणी देत आहेत. योगींनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरची चिंता करावी. त्यांच्या मतदारसंघात शेकडो मुलांचा आजारी पडून मृत्यू होत आहे.'

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यापासून ओवेसी बंधूंच्या ते निशाण्यावर आहेत. ओवेसी यांचे लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, 'आमच्या 100 पिढ्या भारतात राहतील. आम्ही तुमच्याशी लढू आणि तुम्हाला पराभूत करु. आम्हाला पाकिस्तानला पाठवण्याची योगींची क्षमता नाही.'

Web Title:telangana election 2018 Come behead us if you dare Asaduddin Owaisi challenges Yogi Adityanath


संबंधित बातम्या

Saam TV Live