चिचबिलाईचा मोह दोन सख्ख्या भावांच्या जिवावर बेतला...

अभिजीत घोरमारे
शनिवार, 24 एप्रिल 2021

चिचबिलाईचा मोह दोन सख्ख्या भावाच्या जिवावर बेतल्याची घटना भंडारा  जिल्ह्याच्या जवाहरनगर  परिसरातील राजेदहेगाव येथे घडली आहे. नदी किनारील झाडाशेजारील खोल खड्डातील पाण्यात बुडुन त्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. विक्रम विनोद उके (वय 10 वर्ष) व विवेक विनोद उके (वय 5 वर्ष) असे मृतक भावडांचे नाव आहे.

भंडारा - चिचबिलाईचा मोह दोन सख्ख्या भावाच्या Brothers जिवावर बेतल्याची घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या जवाहरनगर Jawaharnagar परिसरातील राजेदहेगाव येथे घडली आहे. नदी River किनारील झाडाशेजारील खोल खड्डातील पाण्यात बुडुन त्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. विक्रम विनोद उके (वय 10 वर्ष) व विवेक विनोद उके (वय 5 वर्ष) असे मृतक भावडांचे नाव आहे. The temptation of chichbilai betrayed the lives of two brothers

जवाहरनगर परिसरातील राजेदहेगाव येथिल ताराचंद उके वय 65 वर्ष हे आपल्या घरातिलच गोदडया,चादरी धुण्यासाठी शेजारील गोवरी येथिल सुर नदीवर गेले होते. आजोबा सोबत त्यांचे दोन नातवंडे विक्रम आणि विवेक सोबत गेले होते. एका किनाऱ्यावर आजोबा Grandfather कपडे धुत होता तर दुसऱ्या किनारी चिचबिलाईचे झाड या मुलांच्या नजरेस पडले, दोघेही धावत चिचबिलाई तोडण्यासाठी गेले. नदी किनारी एका झाडाशेजारी पाण्याने भरलेल्या खोल खड्डयावर तरंगत असलेली चिचबिलाई त्यांना दिसली. चिचबिलाई उचलण्यासाठी  सुरुवातीला विवेक गेला व त्या पाठोपाठ मोठा भाऊ विक्रम  गेला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने लहान भाऊ खड्डयात पडला त्यानंतर मोठा भाऊ पाण्यात पडला.

 यावेळी आजोबा कपडे धुवून नातवंडे घरी गेले असे समजून घराकडे गेले असता घरी न सापडल्याने परत नदी किनारी गेले. तिथे त्यांना शोधा शोध करताना मोठा नातु पाण्यावर तरंगताना दिसला.आरडाओरडा केल्यावर रस्त्यावरील ये-जा करणारे मदतीला धावले,व तरंगत असलेल्या विक्रमला काढुन सावरी येथिल खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. The temptation of chichbilai betrayed the lives of two brothers

या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. घटना स्थळावरील विवेकचा मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्डयातुन काढुन पंचनामा करून दोन्ही मृतदेह Death Body शवविच्छेदन post-mortem करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. ह्या दोन मुलांच्या करुण अंताने राजेदहेगावात शोककळा पसरली आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live