आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावरून बुलडाण्यात सेना-भाजपमध्ये जुंपली

संजय जाधव
रविवार, 18 एप्रिल 2021

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनुदार उद्गार काढल्यानंतर आता बुडडाण्यात भाजप व शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांमधला वाद पेटला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आज गायकवाड यांचे पुतळा जाळला तर शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला

बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांच्या विरोधात अनुदार उद्गार काढल्यानंतर आता बुडडाण्यात भाजप BJP व शिवेसेनेच्या Shivsena कार्यकर्त्यांमधला वाद पेटला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आज गायकवाड यांचे पुतळा जाळला तर शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप आमदार संजय कुटे Sanjay Kute यांचा पुतळा जाळला.Tension Between Shivsena BJP Workers over Statement of MLA Sanjay Gaikwad

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा Corona कहर माजला आहे, रुग्णांना रेमडीसीवीर, ऑक्सीजन, बेड मिळेनासे झाले. ते मिळण्यासाठी राज्य सरकार Maharashtra केन्द्राकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे मात्र केंद्र सरकारकडून कुठलीच मदत मिळेनाशी झाल्याने बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वास्तव आपल्या वक्तयव्यातुन मांडले मात्र बोलताना त्यांची जीभ घसरली. 

आधीचे वृत्त - 

फडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबला असता...बुलडाण्याच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

त्यांमुळे भाजपाने सुद्धा आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध आगपाखड़ केली.. जळगाव जामोद येथील भाजपा अंदाराने १४४ कलम मोडित काढत ५० ते ६० जणांना घेऊन चौकात संजय गायकवाड़ यांचा पुतळा जाळला प्रचंड़ घोषणाबाजी केली तसेच बुलढाणा येथे सुद्धा भाजपा नेते विजयराज शिंदे यानी सुद्धा आमदार गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकानी मज्जाव केला व लोटपाट झाली त्यांमुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस Police स्टेशनमध्ये एकमेकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी जमा झाले होते. Tension Between Shivsena BJP Workers over Statement of MLA Sanjay Gaikwad 

सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते. दरम्यान बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसैनिकानी देवेंद्र फडणवीस व भाजपा आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला यावेळी शिवसैनिकानी भाजपा च्या संजय कुटे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोताळा येथे सुद्धा शिवसैनिकानी भाजपा आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला.

Edited By -  Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live