Big Breaking -दहावी-बारावीच्या परिक्षा आॅफलाईनच होणार

साम टिव्ही ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षा आॅफलाईनच घेण्यात येतील, अशी घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे.

मुंबई : दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत राज्य शासनाने Maharashtra मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षा आॅफलाईनच Off line Exam घेण्यात येतील, अशी घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविना Examination पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. Tenth and Twelth Exams in Maharashtra will be offline

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी या आधीच जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे गायकवाड यांनी काल सांगितले होते. आपण कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत आहोत. पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देणार आहोत, असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

दहावी -बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक - दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागानं सांगितले.

वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण Education अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार आता या वर्गातील विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live