दहावी बारावी परीक्षा ढकलल्या पुढे- दहावी जूनमध्ये, बारावी मे अखेरीस

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री  यांची बैठक पार पडली. या बैठकीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

मुंबई: इयत्ता दहावी आणि बारावीच्या या महिन्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दहावी ची परीक्षा जून June महिन्यामध्ये घेण्यात येईल. तर बारावीची परीक्षा मे May महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येतील. वाढत कोरोना Corona प्रादुर्भाव आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता हा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. enth to twelfth standards exams has been postponed

शालेय शिक्षण मंत्री Minister of Education आणि मुख्यमंत्री CM यांची बैठक पार पडली. या बैठकीनतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच CBSE  आणि ICSE बोर्डाच्या तसेच केम्ब्रिज विद्यापीठाच्या परीक्षांच्यावेळा सुद्धा पुढे बदलण्यात येतील यावर विचारविनिमय सुरु आहे, असे आज वर्ष गायकवाड Varsha Gaikwad यांनी सांगितले. 

कोरोना प्रादुर्भावामुळे MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीतील बहुतेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑफलाइन व्हावी अश्या मागण्या करण्यात येत होत्या. बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे सांगितले गेले होते. यापूर्वीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यंना सरसकट पुढील इयत्तेत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नववी आणि अकरावीतील विद्यार्थी सुद्धा परिक्षेविना पुढील इयत्तेत जाणार आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात बैठकी चालू होत्या. आज वर्ष गायकवाड आणि उद्धव ठाकरे Uddhav Thakrey यांच्या बैठकीतून अंतिम निर्णय देण्यात आला आहे. याची माहिती वर्ष गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live