औरंगाबादजवळ भीषण अपघात

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 मे 2020

पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. हे सर्व मजूर छत्तीसगडचे आहेत.बदनापूर-करमाड दरम्यान आज सकाळी सहा वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे होते.

औरंगाबाद: गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना एका मालगाडीनं चिरडल्यानं १४ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडली.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, इतरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.अपघातग्रस्त रेल्वे गाडी नांदेडहून मनमाडला पेट्रोल-डिझेल घेऊन निघाली होती, अशी माहिती औरंगाबादचे रेल्वे स्टेशन मॅनेजर अशोक निकम यांनी दिली आहे.

पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. हे सर्व मजूर छत्तीसगडचे आहेत.बदनापूर-करमाड दरम्यान आज सकाळी सहा वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊन सातत्यानं वाढत असल्यामुळं त्यांनी घराकडं जाण्याचा निर्णय घेतला आणि गाडी पकडण्यासाठी ते चालतच रेल्वे स्थानकाकडं चालले होते. रात्र झाल्यामुळं सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच पथारी पसरून ते झोपी गेले. 

WebTittle :: Terrible accident near Aurangabad


  


संबंधित बातम्या

Saam TV Live