मुळशीतल्या कंपनीत भीषण आग; अनेक कामगार अडकले

सागर आव्हाड
सोमवार, 7 जून 2021

मुळशीतील उरावडे येथील एसव्हीएस अ‍ॅक्वा कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील उरवडे येथील सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीच्या भीषण आगीत 10 - 15 कामगार अडकून असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  37 पैकी 17 कामगार बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

मुळशी -  मुळशीतील Mulshi उरावडे येथील एसव्हीएस अ‍ॅक्वा कंपनीत SVS Aqua Company भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील उरवडे येथील सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीच्या भीषण आगीत  Fire 10 - 15 कामगार अडकून असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  37 पैकी 17 कामगार बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत  7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. Terrible fire in the original company

एस व्ही एस कंपनीत सध्या सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होत. मात्र  कंपनीत सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. आग आटोक्यात आणण्यासाठी  अग्निशमन  शर्तीचे प्रयत्न करत आहे.   घटनास्थळी चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, तसेच ग्रामस्थ युद्ध पातळीवर मदतकार्य करीत आहे. Terrible fire in the original company

अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावांना पुराचा धोका !

आगीचे प्रमाण प्रचंड असल्याने अद्याप आग विझवणे सुरू आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पराकाष्टा करत आहे. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना अचानक कंपनीला अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live