VIDEO | पाकच्या जिवाला घोर, भारताचं K-4

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे
बुधवार, 22 जानेवारी 2020

आण्विक हल्ला करणाऱ्या मिसाईल्सच्या बाबतीत भारत आणखी बळकट स्थितीत आलाय. कारण भारताच्या मिसाईल ताफ्यात किलर मिसाईल अशी ओळख असणारं K4 मिसाईल दाखल झालंय. पाण्यातून हवेत आणि जमिनीवर आण्विक हल्ला करण्यात सक्षम अशा बॅलिस्टिक मिसाईलची भारतानं यशस्वी चाचणी केलीय. आंध्रप्रदेश किनाऱ्यावरुन बंगालच्या खाडीमध्ये या मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं गेलंय. पापणी लवते ना लवते तोच शत्रूची शहरं उद्ध्वस्त करण्याची क्षमता K-4 मिसाईलमध्ये आहे.के-४ हे बॅलिस्टिक मिसाईल ३५०० किलोमीटर दूरपर्यंत मारा करु शकते.

जमिन आणि आकाशातून मारा करणारी आण्विक मिसाईल भारताकडे होती पण आता पाण्यातून हवेत आणि जमिनीवर आण्विक क्षेपणास्त्र डागण्यात भारत सक्षम झालाय.पाणबुडीतून हवेत आणि जमिनीवर मारा करण्यासाठी K-4 मिसाईची निर्मिती करण्यात आलीय.
200 किलोचा अणुबाँब वाहून नेण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे.रडारच्या निशाण्यावर हे मिसाईल सहजासहजी येत नाही.अरिहंत आण्विक पाणबुडीसाठी खास हे मिसाईल तयार केलं गेलंय.

चीन आणि पाकिस्तानमधील अनेक शहरं या मिसाईलच्या टप्प्यात आहेत, जमिन, आकाश आणि पाण्यातून मिसाईल डागणारा भारत हा जगातला सहावा देश ठरलाय. K सिरिजमधल्या मिसाईल्सवर भारत अनेक वर्ष काम करत होता. त्यामुळे K-4 मिसाईलची निर्मिती हा भारताच्या आण्विक कार्यक्रमातील मैलाचा दगड ठरलाय. 

WebTittle :: Terrible for Pakistan's life, India's K-4

संबंधित बातम्या

Saam TV Live