मिठाच्या पाण्याने गुळण्या करून स्वतःच कोरोनाची चाचणी करा

rtpcr test.jpg
rtpcr test.jpg

नागपुर  : जगभरात कोविड-19 Covid 19 महामारीमुळे अद्यापही चिंताग्रस्त परिस्थिती आहे. कोरोना विषाणूच्या सुरुवातीपासूनच भारतात विषाणूच्या चाचण्या करण्यासाठीच्या पायाभूत क्षमता वाढविण्यासाठी स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील विविध वैद्यकीय संस्था या कार्यात कार्यरत आहेत. अशाताच नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)ने  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)च्या मार्गदर्शनाखाली चंचण्यांची एक विशेष पद्धत शोधून काढली आहे.  ती म्हणजे 'मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत.' निरीने शोधून काढलेली ही पद्धत म्हणजे  या चाचण्यांच्या संशोधन प्रवासात  एक महत्त्वाचा टप्पा आहे.  (Test the corona yourself by rinsing with salt water) 

नवी पद्धत  सुलभ, जलद, सहज, किफायतशीर
नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार यांनी याबाबत माहिती दिली आहे. या चाचणीसाठी किमान पायाभूत सुविधांची गरज आहे. मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याच्या पद्धतीचे अनेक  फायदे आहेत.  याचे सर्व फायदे एका छोट्या उपकरणातून मिळणार आहेत.  हे उपकरण अत्यंत सुलभ, जलद, किफायतशीर आणि विशेष म्हणजे  रुग्णांसाठी आरामदायक आहे.  या उपकरणाने केलेल्या चाचणीतून निकालही जलद मिळतात.  आदिवासी आणि ग्रामीण आणि भागांसाठी ही चाचणी पद्धत अत्यंत उपयुक्त असल्याचे डॉ. कृष्णा खैरणार यांनी सांगितले. 

सध्याच्या आरटी-पीसीआर टेस्टमध्ये स्वॅब गोळा करणे,  नाक आणि घशातून नमुने गोला करणे ही प्रक्रिया अतिशय  त्रासदायक असते. अशातच ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातून असे नमुने गोळा करणे, ते संकलन केंद्रांत आणणे आणि रिपोर्ट तयार करणे ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे. त्या तुलनेत  मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही जलद, आरामदायक आणि रुग्ण-स्नेही पद्धत आहे. त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्षही तीन तासांत मिळू शकतात. 

रुग्ण स्वतःही नमुने गोळा करु शकतात.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत अतिशय सुलभ आहे. यात नाक किंवा घशात कोणतेही उपकरण न घालता करता येणारी पद्धत आहे.  या पद्धतीत रुग्ण स्वतःच आपले नमुने गोळा करू शकतो. 

नाक आणि तोंडातून स्वॅब गोळा करण्यासाठी  तंत्रज्ञानाची गरज असते.   त्याविरुद्ध, मिठाच्या पाण्यातून  गुळण्या करण्यासाठी केवळ खारे पाणी असलेली नलिका वापरली जाते. गुळण्या केल्यावर रुग्णाने ते पाणी त्या नलिकेत जमा करायचे आणि हा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचा. तिथे सामान्य तापमानात,  एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते. त्यानंतर  हे द्रावण गरम केले जाते. गरम झाल्यानंतर त्याचे आरएनए टेम्प्लेट तयार होते. या आरएनए मधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच, रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते.  दरम्यान आता नागपूर महानगरपालिकेने या पद्धतीनुसार चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे,  मान्यताप्राप्त प्रोटोकॉलनुसार, नीरीने चाचण्या घेणे सुरु केले आहे.

Edited By - Anuradha Dhawade 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com