'ठाकरे सरकार हे सैतानी सरकार मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसा.

साम टिव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सरकारने दिवाळी पूर्वी दिलेले फसवे आश्वासन यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सैतानाची उपमा दिली आहे.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सरकारने दिवाळी पूर्वी दिलेले फसवे आश्वासन यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सैतानाची उपमा दिली आहे.

पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक पांचाळ यांच्या प्रचारासाठी  प्रकाश आंबेडकर हे हिंगोली झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

"तुम्हाला मदत हवी असेल तर अजित पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल, कारण तुम्ही माणसांना सत्ता दिली नाही तर सैतानाला सत्ता दिली आहे, आता या सैतानाला माणसात आणायचे असेल तर, स्मशानभूमीतील सांधुकडे तुम्हाला जावे लागेल," असा खोचक टोला देखील आंबेडकर यांनी लगावला.

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने "ऑनलाईन सदस्य नोंदणी" सुरू करण्यात आली आहे. त्या "ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०२० पासून प्रदेश कार्यकारणी राज्यातील विविध जिल्ह्यातील दौरे प्रारंभ करणार आहेत. "गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" ही मोहीम राज्यभर उभारली जाणार आहे. 

घर तेथे वंचित युवा आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्प प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केला आहे. युवा आघाडीच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे  बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते यशवंत भवन अकोला येथे उदघाटन करून नोंदणी खुली करण्यात आली.
या नोंदणी मोहिमेत लाखो संख्येने युवा कार्यकर्त्यांनी नोंदणी करून युवा आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे
.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live