सत्तेवर येताच ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का, अनेक प्रकल्पांना लावला ब्रेक

साम टीव्ही
रविवार, 29 नोव्हेंबर 2020
  • सत्तेवर येताच ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का
  • फडणवीसांच्या प्रकल्पांना ठाकरे सरकारचा ब्रेक
  •  आरे कारशेड हलवली,बुलेट ट्रेनला ब्रेक,नाणारही रद्द
     

ठाकरे सरकारनं सत्तेवर येताच भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकमागून एक धक्के दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारल्यानंतर भलतेच ऍक्शन मोडमध्ये दिसले. सुरुवातीलाच त्यांनी फडणवीसांच्या काळातील महत्त्वांच्या प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा सपाटा लावला. यातील काही प्रोजेक्ट तर शिवसेनेचा विरोधाला न जुमनता भाजपनं रेटले होते. अशा प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली

 

वर्षपूर्ती! ठाकरे सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीचा संपूर्ण आढावा

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवींसाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला ब्रेक लावला. त्यानंतर हायपरलूप प्रकल्पाला स्थगिती देत फडणवीसांना दुसरा धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर बहुचर्चित आरे मेट्रो कार शेड कांजूरमार्ग इथे हलवली. या निर्णायविरोधात विरोधकांनी ठाकरे सरकार चौफेर हल्ला चढवला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प थेट रद्द करुन भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. आशा प्रकारे ठाकरे सरकारनं फडणवीसांच्या कार्यकाळातील शेवटच्या 6 महिन्यांतील काही प्रकल्प थांबवले तर काही प्रकल्पांचा फेरआढावा घेऊन निर्णय घेतला

ठाकरे सरकारनं फडणवीसांच्या काळातील प्रकल्पच नव्हे तर महत्त्वाचे काही निर्णयही बदलेत. उद्धव ठाकरेंनी यातून भाजप नेतृत्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे....ठाकरे सरकारनं वर्षपूर्ती  केलीय. आणखी चार वर्ष बाकी आहे..त्यामुळे या चार वर्षात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगणार असचं दिसतंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live