म्यूकरमायकोसि उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज...

कल्पेश गोरडे
शुक्रवार, 14 मे 2021

या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ठाणे :  कोरोनाचा Corona प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस Mucormycosis  या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे Thane महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Ekanath Shinde orders to Prepare Thane Hospital for treatment of Mucermicosis 

हे देखिल पहा - 

ठाणे Thane जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे Ekanath Shinde यांनी गुरुवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सोलापुरातील किराणा दुकाने उद्यापासून सुरु होणार

अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याशिवाय या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.Ekanath Shinde orders to Prepare Thane Hospital for treatment of Mucermicosis 

त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील निश्चित करण्याचे करण्यात आले. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live