तुम्ही घरात, ATMमध्ये चोर, 48 तासात 4 ATMमध्ये चोऱ्या

साम टीव्ही
बुधवार, 16 सप्टेंबर 2020
  • तुम्ही घरात, ATMमध्ये चोर
  • कोरोनाचा फायदा चोरांना
  • 48 तासात 4 ATMमध्ये चोऱ्या

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरात आहात.. आणि तिकडे चोर तुमच्या ATMवर डल्ला मारतोय... जग कोरोनामुळे भीतीच्या सावटात जगत असतानाच, चोरांनी मात्र कोरोनाचा फायदा करुन घतेलाय.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत. आणि चोर याचा फायदा उचलतायत.  नागपुरात 48 तासांत चोरट्यांनी 4 ATMवर डल्ला मारलाय. मुख्य म्हणजे हे चारही एटीएम एसबीआय बँकेचे आहेत. धक्कादायक म्हणजे चोरी झालेल्या एकाही एटीएम मध्ये चौकीदार नव्हता.

आशीर्वादनगरमधील द्वारका कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर एसबीआयचं एटीएम आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास एक तरुण घुसला. त्याने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकलं.  पीन कोड टाकला. मशिनमधून पैसे बाहेर येताच युवकाने मशिनमध्ये काहीतरी टाकलं. मशिनमधून एक लाख ६६ हजार रुपये बाहेर निघाले. त्यानंतर मशिन बंद पडली... आणि अलार्म वाजला.... कर्मचारी तिथे पोहोचले. पण तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.

शीर्वादनगर प्रमाणेच चोरट्यांनी याच पद्धतीने हिंगणा टी-पॉइंट, कळमना आणि म्हाळगीनगरमधील चार एटीएममधून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. 

व्हिओ- कोरोनाच्या लॉकडाऊनध्ये आधीच रस्त्यावर वरदळ कमी त्यात कामगार कपातीमुळे एटीएमध्ये पूर्णवेळ वॉचमनही नाहीत. वरुन तोंडावर मास्क. या सगळ्या परिस्थितीचा फायदा चोरटे घेतायत. आणि तुम्ही घरात असताना तुमच्या एटीएममधून पैसे काढतायत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live