उद्यापासून दिवाळीत अशा असतील जास्तीच्या बसेस!

उद्यापासून दिवाळीत अशा असतील जास्तीच्या बसेस!

मुंबई  - दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी सज्ज झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या आगारांतून दिवसाला 359 जादा बस सोडण्यात येणार आहेत. 24 ऑक्‍टोबर ते पाच नोव्हेंबर या दहा दिवसांत 3,500 जादा बस प्रवाशांच्या सेवेत असतील. 

दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जादा बस सेवेचे नियोजन केले आहे. त्यासाठी विभागनिहाय बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटीने जादा बसच्या आरक्षणाची सुविधा प्रत्येक आगार, स्थानके, संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून उपलब्ध करून दिली आहे. 

राज्यात रक्षाबंधनानंतर भाऊबिजेला प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटीच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची "प्रवासी मित्र' म्हणून नियुक्ती केली जाईल. दिवाळीचा हंगाम संपेपर्यंत एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या कमी करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एसटी महामंडळाने दिवाळीत हंगामी भाडेवाढ न केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

विभागनिहाय जादा बसगाड्या 
पालघर : 22, सिंधुदुर्ग : 8, मुंबई : 12, ठाणे : 19, रत्नागिरी : 14, पुणे : 64, कोल्हापूर : 7, सातारा : 3, सांगली : 4, अमरावती : 2, यवतमाळ : 5, नाशिक : 23, जळगाव : 8, धुळे : 35, नगर : 9, औरंगाबाद : 14, बीड : 9, जालना : 5, लातूर : 10, नांदेड : 13, उस्मानाबाद : 11 आणि परभणी : 23. 

Web Title: There are 359 extra buses daily from tomorrow for Diwali Vacation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com