शिर्डीतील साई मंदिराचे अर्थकारण ठप्प; दानात मोठी घट 

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

लाखोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. पन्नास हजारांहून अधिक लोकांची उपजीविका शिर्डीवर अवलंबून आहे. मात्र लॉक डाऊनमुळे हॉटेल, फुल विक्रेते, रिक्षा चालक, छोटे-मोठे व्यवसायिक या सर्वांनाच लॉकडाऊनचा फटका बसला आहे. 

शिर्डी: लाखोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत Shirdi दर्शनासाठी येत असतात. पन्नास हजारांहून अधिक लोकांची उपजीविका शिर्डीवर अवलंबून आहे. मात्र लॉक डाऊनमुळे Lockdown हॉटेल, फुल विक्रेते, रिक्षा चालक, छोटे-मोठे व्यवसायिक या सर्वांनाच लॉकडाऊनचा फटका बसला असून साई बाबा मंदिराच्या Sai Mandir Temple येणाऱ्या दानातही मोठी घट झाली आहे. There has been a big drop in donations to Sai Baba Temple

गेल्या दीड वर्षांपासून अशीच स्थिती कायम आहे. लोकांना आशा वाटते की, केव्हा लॉकडाऊन उठेल आणि परिस्थिती पुन्हा पूर्वी सारखी कधी होईल. जे व्यवसाय ठप्प झालेत ते पूर्वी सारखे केव्हा होतील हीच आशा शिर्डीकरांना लागली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पोलिसांना मोठी बाधा !

शिर्डीवर हजारो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. साईबाबा मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक Devotees शिर्डीत येत असतात. साई मंदिर बंद असले की येथील उद्योग व्यवसाय ठप्प होतात. शिर्डी मध्ये साधारण एक वर्षांमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक भाविक येतात. त्यामुळे येथील फुल-हार, प्रसादाचे दुकाने, हॉटेल रेस्टॉरंट, रिक्षा चालक या सगळयांचे उद्योग व्यवसाय यावर अवलंबून असतात. 

मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात साई मंदिर बंद झाले आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे तब्बल आठ महिन्यांनी मंदिर उघडले. काही प्रमात उडद्योग व्यवसाय सुरू झाले तर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने लॉकडाऊन सुरू झाले आणि मंदिर बंद करण्यात आले.

भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने त्याचा मोठा फटका शिर्डीतील अर्थकारणाला बसला आहे. कोरोना Corona काळात साई संस्थानच्या दानात तब्बल तीनशे कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्यावर्षी साई संस्थानला ३५७ कोटी रुपयांचे दान आले होते. मात्र कोरोना काळात ६२ कोटींचं दान मिळाले आहे. There has been a big drop in donations to Sai Baba Temple

हे देखील पहा -

दरवर्षी लाखो साई भक्त शिर्डीत येत असतात, आणि साईभक्तांकडून मंदिराला दानही केलं जातं. या काळात दानाची रक्कम कोटीच्या घरात असते. मात्र कोरोनाचा परिणाम साई संस्थानला मिळणाऱ्या दानाला झाला आहे.

गेल्या तीन वर्षातील दानाची आकडेवारी ; 
२०१८-१९ या वर्षात : ४२८ कोटींचं दान आले
२०१९-२० या वर्षात : ३५७ कोटींचं दान झालं आहे.
त्यामुळे शिर्डीतील अर्थकारणाला लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसलेला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live