भयानक : सोलापुरात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागाच नाही... 

विश्वभूषण लिमये
गुरुवार, 15 एप्रिल 2021

सोलापूर मध्ये रुपभवानी स्मशानभूमीमध्ये आज अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देखील उपलब्ध नसल्याचं चित्र समोर आले आहे

सोलापूर :सोलापूर Solapur शहरात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू Dead होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दुसऱ्या लाटेने कहरच केले आहे. There is no place for cremation in Solapur

सोलापूर मध्ये रुपभवानी स्मशानभूमीमध्ये आज अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देखील उपलब्ध नसल्याचं चित्र समोर आले आहे. काल मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची राख सावडण्याआधीच आज पुन्हा स्मशानभूमीत मृतदेहांची गर्दी झाल्याचं पहायला मिळाल आहे.

दरम्यान स्मशानभूमीत  राख साफ करण्यासाठीसुद्धा कुणी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू पावलेल्यांना ही स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करायला जागा उपलब्ध होत नाही. काल सोलापूर शहरामध्ये 307 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्यातील  8 जणांचा कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील चित्र दिवसेंदिवस विदारक होत आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live