आता मिळणार अस्सल सोनं, हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही

साम टीव्ही
गुरुवार, 25 मार्च 2021

सोन्याची खरेदी म्हटलं की अस्सल सोनं मिळेल याची खात्री नसते, मात्र आता तुम्ही मोजलेल्या दामाच्या बदल्यात अस्सल सोनं मिळण्याची हमी मिळालीय.

 

सोन्याची खरेदी म्हटलं की अस्सल सोनं मिळेल याची खात्री नसते, मात्र आता तुम्ही मोजलेल्या दामाच्या बदल्यात अस्सल सोनं मिळण्याची हमी मिळालीय.

सोन्याच्या दागिन्यांची हौस ही भारतीयांची ओळख..मात्र सोने खरेदीत अनेकदा फसवणूक होते. पैसे मोजूनही शुद्ध सोनं मिळेलच याची खात्री नसते. मात्र आता सोन्याच्या दागिन्यांसाठी केंद्र सरकारने हॉलमार्क बंधनकारक केलंय. 

काँग्रेसच्या हातून जाणार यूपीएचं अध्यक्षपद? युपीएचं नेतृत्व करण्याची शरद पवारांना गळ

येत्या 1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS ने सर्व नोंदणीकृत ज्वेलर्ससाठी अधिसूचना जारी केलीय. शिवाय सोन्याची शुद्धता 22 कॅरेट, दुसरं 18 कॅरेट आणि तिसरं 14 कॅरेट अशा तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. 

या नव्या नियमांमुळे सोन्याच्या विक्रीत होणारी ग्राहकांची फसवणूक टळेल, शिवाय विक्रेत्यांमध्येही व्यवहाराची स्पष्टता राहील. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live