लोकप्रतिनिधी मुजोर, अधिकारी लाचार.. लोकशाहीला आणि आरोग्य व्यवस्थेला नाही उरला आधार  

जयेश गावंडे
शनिवार, 24 एप्रिल 2021

मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून रात्री मुक्कामी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागते. शासनाने अनेक रुपये खर्चून बांधलेले वैद्यकीय अधिकारी निवास शोभेची वस्तू बनले आहे. येथे कोरोना रोधक लसींचा नियमित पुरवठा होत नाही. अनेक पीडितांना आणि आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी हिवरखेड पोलीस येथे घेऊन येत असतात त्यांना आल्या पावली परत जावे लागते कारण येथे एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर नसल्याने पोलिसांनाही पीडितांना सोबत घेऊन अकोट तेल्हारा अडगाव इत्यादी ठिकाणी भटकावे लागत आहे.

अकोला - ४०००० च्यावर लोकसंख्या असलेले आणि विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अकोला जिल्ह्यातील हिवरखेड Hiwarkhed एक गाव आहे. पण आरोग्य केंद्रात प्रमुख सुविधांचा येथे अभाव आहे. हिवरखेड आणि आजूबाजूची गावे अशा जवळपास एक लक्ष लोकांच्या आरोग्याची Health जबाबदारी असल्यामुळे येथे कमीत कमी दोन १०८ रुग्णवाहिकांची Ambulance नितांत गरज असताना याउलट पूर्वी असलेली १०८ रुग्णवाहिका सुद्धा कोविड Covid साठी अकोल्याला Akola पळविल्या गेली. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आतापर्यंत अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी उदाहरणे आहेत.  There is no support left for democracy and health system

येथे मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून रात्री मुक्कामी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागते. शासनाने अनेक रुपये खर्चून बांधलेले वैद्यकीय अधिकारी निवास शोभेची वस्तू बनले आहे. येथे कोरोना Corona रोधक लसींचा नियमित पुरवठा होत नाही. अनेक पीडितांना आणि आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी हिवरखेड पोलीस येथे घेऊन येत असतात त्यांना आल्या पावली परत जावे लागते कारण येथे एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर Doctor नसल्याने पोलिसांनाही पीडितांना सोबत घेऊन अकोट तेल्हारा अडगाव इत्यादी ठिकाणी भटकावे लागत आहे.

येथे आरोग्य केंद्रात रिक्त पदांची यादी लांब आहे. परंतु विविध फलकांवर मान्यवरांच्या नावाची भरमार आहे. येथे एकूण नावे व पदांचे ४ फलक लावलेले असून त्यावर जवळपास ८३ नावे व पदाची नोंद आहे. पण संबंधित मान्यवरांचे, लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मोबाईल नंबर कोठेही लिहिलेली नाहीत. इतकी नावे असताना त्यातील काहींचे जरी संपर्क क्रमांक नमूद केलेले असले तर रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत झाली असती.  आणि आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांचे जीव वाचवता येतील अशी समस्या  महत्त्वाच्या बैठकीत मांडणाऱ्या जागरूक पत्रकाराला एका लोकप्रतिनिधीने मुजोरी करीत, मोठ्याने जोराच्या आवाजात दबावतंत्राचा वापर करून, अरेरावीच्या शब्दात, धमकवण्याचा आणि सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रकार हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये घडला आहे.

दि १९. एप्रिल रोजी कोरोना संदर्भात उपाययोजना, नियोजन, आणि महत्त्वाच्या चर्चेसाठी अकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर,  सहाय्यक गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे,  विस्तार अधिकारी सतीश सरोदे, सरपंच सीमा संतोष राऊत, उपसरपंच रमेश दुतोंडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर, आणि अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची हिवरखेडचे व्यापारी आणि पत्रकार बांधवांसोबत बैठक पार पडली. There is no support left for democracy and health system

सदर बैठकीत एका पत्रकाराने आरोग्यावर चर्चा सुरु असताना वरील मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना माहिती देत असताना एका लोकप्रतिनिधीचे पित्त खवळले आणि सदर लोकप्रतिनिधीने सर्व उच्चस्तरीय अधिकारी, पोलीस आणि सर्व व्यापारी बांधवांसमोर पत्रकारावर दबावतंत्राचा वापर करीत सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपरोक्त प्रकार काही अपवाद वगळता सर्वजण लाचारीने बघत होते. त्यामुळे "लोकप्रतिनिधी मुजोर, अधिकारी लाचार.. लोकशाहीला आणि आरोग्य व्यवस्थेला नाही उरला आधार.." अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live