VIDEO| मंदी आली, नोकरी सांभाळा

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे
बुधवार, 15 जानेवारी 2020

नोकरी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चालू वित्तीय वर्ष चिंता वाढवणारं आहे. अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीमुळे चालू वित्त वर्षात 16 लाख नोकऱ्या जाणार आहेत. एसबीआयच्या एका अहवालानं नोकरदारांची चिंता वाढवलीय.

वित्त वर्ष 2018-19मध्ये ईपीएफओनं देशभरात 89 लाख 70 हजार नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी विकासदर हा 7 टक्क्यांच्या जवळपास होता. पण 2019-20मध्ये विकासदर पाच टक्क्यांहून खाली येण्याची चिंता व्यक्त करण्यात आलीय. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेपायी नोकऱ्यांमध्ये 15.8 टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या आधारावर केंद्र आणि राज्य सरकारे 2019-20मध्ये नव्या नोकऱ्यांची संख्या 39000ची कपात करू शकतात.

मंदीचा सर्वाधिक प्रभाव उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यांवर पडणार आहे. देशासमोर आर्थिक मंदी आ वासून उभी आहे, सुस्तावलेली अर्थव्यवस्था रुळावर यायचं नाव घेत नाहीये. त्यातच आता एसबीआयच्या एका अहवालानं अर्थव्यवस्थेसह भारतीय नोकरदारांची चिंता वाढवलीय.

WebTittle :: There was a recession, take a job

संबंधित बातम्या

Saam TV Live