मधुमेह असलेल्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात खाव्यात ''या'' गोष्टी; साखेरची पातळी राहील नियंत्रणात

Diabetic lunch 1
Diabetic lunch 1

मधुमेह ही आजची एक गंभीर समस्या आहे. मधुमेह झालेल्या रूग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण खाण्यापिण्यात थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहचू शकते. मधुमेहासाठी कोणताही ज्ञात इलाज नाही, अन्न आणि जीवनशैलीमध्ये बदल करून हे नियंत्रित केले जाऊ शकते. मधुमेह अनुवंशिक ,वृद्धत्वामुळे,  लठ्ठपणामुळे किंवा तणावामुळे होऊ शकतो. मधुमेह ग्रस्त लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते. यासह, मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होणे आणि पाय निष्क्रिय करणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य इत्यादींचा समावेश करावा.(These are things that patients with diabetes should eat at lunch; Sugar levels remain under control)

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सेवन करा या गोष्टी

1) हिरव्या पालेभाज्या
 हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास, दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खा. खरं तर पालक, मेथी, चाकवत , ब्रोकोली, दुधी भोपळा, कारले इत्यादिसारख्या भाज्यांमध्ये कमी कॅलरी असतात आणि जास्त पोषक द्रव्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

2) मासे 
जर तुम्ही नॉन-व्हेज खात असाल तर दुपारच्या जेवणामध्ये माशांचा समावेश करा. याशिवाय आपण सार्डिन, हेरिंग, साल्मन फिश देखील खाऊ शकता. मासे हे मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानले जातात. ओमेगा -3 फॅटी ॲसिड डीएचए आणि ईपीए माशामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे सूज कमी होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

3) दही
जर तुम्ही मधुमेह ग्रस्त असाल तर दुपारच्या जेवणामध्ये दह्याचे सेवन करा.  दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातो. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि पौष्टिक पदार्थांचे प्रमाण चांगले असते. दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

4) विविध डाळी  
अख्खे दाने आणि डाळींना पोषक तत्वाचे भांडार मानले जाते. कारण त्यात भरपूर प्रथिने, पोटॅशियम, फायबरचे घटक असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोजच्या  दुपारच्या जेवणाच्या वेळी डाळी आणि अख्खे दाने याचा समावेश केला पाहिजे . याद्वारे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com