या लोकांमुळे महाराष्ट्रात लॅाकडाऊन लागू शकतो

साम टीव्ही
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलीय, मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचेही आकडे वाढतायत. त्यामुळे, मुंबईची लोकल कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरतेय का ?   

मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलीय, मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचेही आकडे वाढतायत. त्यामुळे, मुंबईची लोकल कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरतेय का ?  आणि मुंबईकरांचा बेजबाबदारपणा कोरोना संसर्ग वाढवतोय का  हे मुद्दे ऐरणीवर आलेयत म्हणूनच  बेजबाबदार रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात झालीय पाहूयात . 

 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आलाय. आधी फक्त अत्यावश्यक सेवेतील मुंबईकरांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही नियम घालून सर्वांसाठी लोकलसेवा सुरू झाल्यामुळे, 

पश्चिम रेल्वेवर दररोज १७ लाख ५९ हजार १२३ प्रवासी प्रवास करतायत, तरमध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या २१ लाखांवर पोहोचलीय. मात्र, लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचं समोर आलंय.

म्हणूनच, विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास रेल्वे प्रशासनाने सुरूवात केलीय. पादचारी पूल, फ्लॅटफॉर्म, स्टेशनच्या प्रवेशद्वारांवर रेल्वे आणि पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने आतापर्यंत दोन हजार ५५८ विनामास्क प्रवाशांवर कारवाई केलीय. यात पश्चिम रेल्वेच्या दोन हजार ५५८, तर मध्य रेल्वेवरील २,०६० प्रवाशांवर कारवाई करण्यात आलीय. दोन्ही मार्गावरील विनामास्क प्रवाशांकडून साडेचार लाख रुपये दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये, सीएसएमटी- १७१५, कुर्ला- १३३ आणि कल्याणमध्ये 90 विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात आलीय. 

त्यामुळे, मुंबईकरांनी वेळीच जागं होऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या नियमांचं पालन करायला हवं. नाहीतर, मुंबापुरीची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल कोरोनाचीही वाहिनी बनू शकते.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live