पकडले जाऊ नये म्हणून चोराने फिल्मी स्टाईल ने मारली नदीत उडी ! 

अजय दुधाणे
शनिवार, 5 जून 2021

आपण पकडले जाऊ नये म्हणून चोराने चक्क नदीत उडी टाकल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे. मात्र या चोराला काही तरुणांनी नदीत उडी मारून बाहेर काढले आहे

उल्हासनगर: आपण पकडले जाऊ नये म्हणून चोराने चक्क नदीत उडी टाकल्याचा प्रकार उल्हासनगर Ulhasnagar मध्ये समोर आला आहे. मात्र या चोराला काही तरुणांनी नदीत उडी मारून बाहेर काढले आहे. The thief jumped into the river to escape from being caught

वडोल गाव परिसरातील वालधुनी नदीत Valdhuni river हा प्रकार घडला आहे. उल्हासनगर अंबरनाथ Ambarnath शहराच्या सीमेवर साईबाबा मंदिराजवळ दुपारी दोन चोरटे एक दुचाकी चोरी करून पळत होते. 

रेल्वे प्रवासासाठी मुंबई महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट !

याच वेळी ज्याची दुचाकी होती ते दुसऱ्या एका दुचाकी वरून या चोरांचा पाठलाग करत होते. ते दुचाकी चोर साईबाबा मंदिराजवळ आले असता, चोराची दुचाकी अचानक स्लिप झाली. त्यामुळे चोरीची ही दुचाकी तिथेच सोडून चोर पळून गेले. 

 हे देखील पहा - 

त्यांच्यातील एका चोराने तर वालधुनी नदीतच उडी मारली ! चोराच्या या कृत्यामुळे सागर भिंगारदिवे या तरुणाने त्याच्या मित्रांसह नदीतून या चोरट्याला बाहेर काढले. या दोन्ही चोरांना सध्या उलहसनगर मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यावरील पुढील कारवाई पोलीस Police करत आहेत.

Edited By- Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live