पिंपरी महापालिकेच्या अण्णासाहेब मगर जम्बो कोविड सेंटर मध्ये घुसले चोर !

Thieves are stealing patients belongings at the Jumbo Covid Center in Pune
Thieves are stealing patients belongings at the Jumbo Covid Center in Pune

पुणे: पिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad महानगरपालिकेच Municipal Corporation अण्णा साहेब मगर स्टेडियम AM Stadium  मधील जम्बो कोविड सेंटर Jumbo Covid Center मध्ये कोरोना ग्रस्त रुग्णाचे जीव तर जाताच आहेत. मात्र आता कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे पैसे, सोन्या - चांदीचे दागिने आणि मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू देखिल चोरी जात असल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Thieves are stealing patients belongings at the Jumbo Covid Center in Pune

प्रशांत मोरे यांचं जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल होता. जम्बो सेंटर प्रशासनाने प्रशांत मोरे यांचे पार्थिव Dead Body तर दिले. मात्र त्यांचे पैसे असलेलं पर्स, मोबाईल आणि ए टी एम कार्ड परत दिलेच नाहीत. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणींच्या वस्तू आपल्याला मिळाव्या म्हणून नातेवाईक वैष्णवी खुळे हिने जम्बो कोविड सेंटर प्रशासनाकडे विचारपुस केली. तेव्हा त्यांच्या वस्तु चोरीला गेल्याच त्यांना सांगण्यात आले. जम्बो सेंटरने उपचार अभावी मोरे यांचा जीव तर हिरावलाच. पण आता त्यांच्या शेवटच्या आठवणी सुध्दा चोरांनी हिरावल्या असल्याची खंत आहे. 

हे देखील पहा -

अशाच प्रकारची घटना सागर गुजर या तरुणा सोबत देखिल घडली आहे. सागरची आई शीतल गुजर यांचा जम्बो कोविड सेंटर मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र उपचारादरम्यान सागरच्या आईच सोन्या - चांदीचे दागिने देखिल चोरीला गेले आहेत. जम्बो सेंटरच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सागरच्या आईचा जिवं तर गेला, मात्र तिच्या शेवटच्या आठवणी असलेल्या सोन्या चांदीचे दागिने सुद्धा चोरी गेले. असे सागरचे म्हणने आहे. Thieves are stealing patients belongings at the Jumbo Covid Center in Pune

वैष्णवी खुळे आणि सागर गुजर या दोन्ही तक्रार दाराच्या तक्रारी वरून पिंपरी - चिंचवड पोलिसांनी Police पिंपरी पोलिस स्टेनश मध्ये दोन स्वतंत्र चोरीचा गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर मधिल चोर कोण हे शोधण्याच मोठं आवाहन पोलिसां समोर आहे. 

जीवघेण्या कोरोना साथीच्या या कठीण काळात लोकांना योग्य उपचार मिळावा, म्हणून पिंपरी - चिंचवड महापालिकेने खासगी कंत्राटदारांना कोविड सेंटर चालवायला दिले आहेत. मात्र महापालिकेच्या कोविड सेंटर मध्ये मृताच्या टाळू वरिल लोणी खाण्याचं काम कोविड सेंटर प्रशासन करत आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com