पिक कर्जाची रक्कम घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची पैशाची बॅग चोरटयांनी केली लंपास

संजय जाधव
मंगळवार, 20 एप्रिल 2021

स्टेट बैंक मधुन रमेश आत्माराम शिंबरे या शेतकऱ्याने पीककर्ज काढले होते.  ५० हजार रुपयांची रक्कम एका थैलित टाकून मोताळा शहरातील मुख्य रस्ता पार करतांना पाठिमागून एक भरधाव बाईकस्वार आला व त्याने ही बॅग हिसकावून पोबारा केला

बुलढाणा : बुलढाणा Buldhana शहरातील मोताळा Motala येथे चोरटयांनी भरदिवसा धुमाकूळ घातला आहे. स्टेट बैंक State Bank मधुन रमेश आत्माराम शिंबरे या शेतकरयाने पिककर्ज काढले होते. ५० हजार रुपयांची रक्कम एका थैलीत Bag टाकून मोताळा शहरातील मुख्य रस्ता पार करतांना पाठिमागून एक भरधाव बाईकस्वार आला. त्या बाईकवर दोघे जण होते, पाठीमागे बसलेल्या चोराने शेतकरी रमेश शिंबरे यांच्या हातातील पैशाची थैली हिसकावली व दोघे  फरार झाले आहेत. Thieves stole money bags of farmers carrying crop loans

ही घटना सीसीटीव्ही CCTV मध्ये  कैद झाली आहे. अगोदरच कोरोनाने Corona खचलेला शेतकरी या घटनेने हवालदिल झाला, असून बोराखेड़ी पोलिसात Police तक्रार दिली आहे.  पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बुलढाणा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live